नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी स्वायत्त संस्था जैवतंत्रज्ञान विभागाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांपासून देशभरातील 80 जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळले नाही. त्याचबरोबर गेल्या 28 दिवसांपासून 17 जिल्ह्यांत संसर्ग झालेला नाही. हर्षवर्धन म्हणाले, ‘गेल्या सात दिवसांपासून 80 जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळले नाहीत. त्याचबरोबर, गेल्या 14 दिवसांत कोरोना केसस दुप्पट होण्याचे प्रमाण 8.7 होते. तर गेल्या सात दिवसात हा दर 10.2 आहे. त्याचबरोबर, मागील तीन दिवसांपासून हा दर अंदाजे 10.9 आहे.
या व्यतिरिक्त आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि संबंधित विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड-19 पाळत ठेवण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.