जयपूर (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच राज्यांतर्फे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्यात येतोय. अशातच आज राजस्थान सरकारतर्फे देखील पुढील आठवड्यापर्यंत राज्य दिवसाला दहा हजार टेस्ट करण्याची क्षमता गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. राजस्थानात आतापर्यंत २३२८ जणांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील कोरोनमुक्तीचा दर वाढत असल्याची माहिती राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांमध्ये या विषाणूची सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने जास्तीत जास्त चाचण्या करून कोरोनाचा प्रसार थांबवणं गरजेचं बनलं आहे. करोनाग्रस्तांची ओळख पटावी यासाठी अनेक राज्यांमध्ये घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून कोरोना संशयितांच्या चाचण्या घेतल्या जातायेत.