मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून दारु मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दारूचे दुकाने ही फोडली गेली . दारू तलफ भागवण्यासाठी मद्यपी काहीही करू लागलेत. असाच काहीसा प्रकार फलटण तालुक्यातील जिंती येथे घडला. दारूची तफल झाल्याने दोघांनी सॅनिटायझरसाखरे लिक्विड पिल्याने यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. किरण सुरेश सावंत वय (वय 30),दिपक राघु जाधव (वय 32 )यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही मोलमजुरी करतात. काही दिवसापूर्वी ते पुणे जिल्ह्यातील राख या गावी डाळिंब छाटणीसाठी गेले होते. चार दिवसापूर्वी ते जिंती येथे आपल्या घरी आले या दोघांनीही ही जिल्हाबंदीच्या उल्लंघन केल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते दरम्यान हे दोघे घरापासून जवळच असलेल्या ओढ्या जवळ बसून कसलीतरी लिक्विड प्यायले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने फलटण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या दोघांचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कोणते लिक्विड प्यायले आहे हे समजेल. फलटण ग्रामीण ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली