- सादर नमस्कार!
_आज प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या दहशती खाली वावरतो आहे. जग थांबल्या सारखं झालंय.रोजच्या कोरोना संबंधिच्या विविध भयावह बातम्या वाचून, पाहून किंवा ऐकून तो निराश होतोय. इतकंच काय,तर आज त्याचा स्वतः वरचा विश्वासच कमी होतोय._
_काय म्हणावं या कोरोनाला? दहशत एवढी आहे कि,माणूस कोविड रुग्णालयाजवळून जायलाही घाबरतो,अनेक जण रस्ता बदलून जातात तर काही वाहन रुग्णालयाजवळ येताच असा वेग वाढवतात की,जसं काही कोरोना वेताळासारखा उडी घेऊन मानगुटीवर बसणार आहे._
_आजच्या या कोरोना विरुद्धच्या लढाईत काही असामान्य लोक आहेत,जे स्वतः जीव धोक्यात घालून या कोरोना युद्धात खंबीरपणे लढा देत आहेत, कोरोना बाधितांना मदत आणि बळ देत आहेत व सर्वात महत्त्वाचं समाजात ‘सकारात्मकतेच संतुलन’ टिकवण्याचे महत्त्वाचं कार्य ते करीत आहेत._
_अश्याच काही प्रेरक, सकारात्मक, कर्तबगार योद्धयांचा अभिमान असायलाच हवा,आणि म्हणूनच… “Heart of Gold” ‘कोरोना योद्धांची प्रेरक कहाणी’ आपल्यासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचा आहे._
_आपणही त्यांना कमेंट करून त्यांच्या कार्याला सॅल्युट करू शकता व आपल्या परिचयातील जर अशी कुणी व्यक्ती असेल तर त्याची माहिती अथवा संपर्क क्रमांक आम्हाला 7769888845 या नंबरवर पाठवू शकता, जेणेकरून या मालिकेत त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे आम्हाला सदभाग्य लाभेल._
सुशिलकुमार बाफना
(संचालक)
रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स_