जळगाव (प्रतिनिधी) -शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अँड ए बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा 22 ते 24 मे, 2020 दरम्यान घेण्यात येणार आहे.
सदर परिक्षेसाठी https://gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 मार्च, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिक्षार्थींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना/माहिती सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in व https://gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जे परिक्षार्थी जी. डी. सी अँड ए व सी. एच. एम या परिक्षा देवू इच्छित असतील, अशा परिक्षार्थीनी परिक्षेसंदर्भातील आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरून प्राप्त करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहाकारी संस्था, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव मेघराज राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.