*गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी विद्यापीठांमधील भोंगळ कारभार आस जबाबदार व्यक्तींवर लवकरच गुन्हे दाखल करण्याचे दिले आश्वासन*
जळगाव (प्रतिनिधी) – आज मुंबई वरून वाशिम येथे जात असताना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी आज जळगाव येथे धावती भेट दिली असता जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काही मागण्या विषयी गृहमंत्री यांच्यासोबत चर्चा करून निवेदन दिले.
कोविड योद्ध्यांना विशेष प्रोत्साहन वेतन आयोग लागू करावा
संपूर्ण राज्यामध्ये कोणाच्या अतिगंभीर परिस्थितीमध्ये राज्यातील संपूर्ण प्रशासन अतिशय जबाबदारीने आपले कार्य पार पाडत आहे
गेल्या 60 दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे कोविड योद्धे म्हणजेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस सफाईकामगार, पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या परीवारा पासुन दुर राहत राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आपली जबाबदारी पार पाडत आहे अशा सर्व कोविंड योद्धे यांच्यासाठी राज्य सरकार मार्फत विशेष प्रोत्साहन वेतन आयोग लागू करण्यात यावा जेणेकरून या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले जाईल अशा प्रकारची मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने आज गृहमंत्र्यांना करण्यात आली
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारास व भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधात लवकरच गृहमंत्री गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील
आज कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हुकुमशाही मध्ये संघ विचारधारेच्या लोकांचा सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविषयी सर्व माहिती आज गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांच्या कानी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी घातली
विद्यापीठांमधील सीसीटीव्ही कॅमेरे च्या टेंडर पासून ते सिक्युरिटी च्या ठेक्या पर्यंत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविषयी व राज्यपालांच्या मेहरबानी मुळे आयते पदे घेऊन आलेल्या बेजबाबदार व भ्रष्ट लोकांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्री नामदार अनिलजी देशमुख यांच्याकडून देण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी आज जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेला दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अभिषेक पाटील कुणाल पवार आदी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.