• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आता अधिक तीव्र करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचा दुप्पट होण्याच्या वेगात मोठी घट झालेली दिसून येत आहे. हा वेग १४ दिवसांवर आला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. कालपासून महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईचा (होम आयसोलेशन ) शिक्का मारला जाणार आहे. तसेच त्यांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक केले आहे.

तसेच सुरक्षित अंतराचे नियम पाळत प्रवाशांना वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. मात्र कंटेनमेंट झोनमधून हा प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक असून या कालावधीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश मंगळावारी निर्गमित करण्यात आले.

प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाने यासंदर्भात काल मार्गदर्शिका प्रसारित केली. ही मार्गदर्शिका हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. जे प्रवासी राज्यात कमी कालावधीसाठी येणार आहेत (एक आठवड्यापेक्षा कमी) आणि त्यांचे पुढील प्रवासाचे किंवा परतीचे नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. तथापि, या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये, यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधित घोषणापत्र भरावे. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसेच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसेच प्रवाशांकडून विमानतळावर तसेच विमानत चढ-उतार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. प्रवाशांनी राज्यातील विमानतळावर उतरल्यानंतर स्वयंघोषणापत्र भरुन सादर करावयाचे आहे, असे सूचित करण्यात आले आहे.

विमानतळाचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्याता आले आहे.


 

 

Previous Post

राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ हजार ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला जोरदार पावसाचा फटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला जोरदार पावसाचा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !
1xbet russia

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon