अमळनेर (प्रतिनिधी) – येथे काल रात्री उशिरा साने गुरुजी कॉम्प्लेक्स मधील गाळा क्र 06 मध्ये छापा टाकून 87,740/- रु किमतीचा ऐवज दारूच्या बाटल्या,सट्टा आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. यासंदर्भात तील फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली आहे.अमळनेर शहरात सानेगुरुजी कॉम्पलेक्स मधिल बंदिस्त गाळा क्रमांक 06 मध्ये इसम नामे जिजाबराव भिका पाटील हा गैरकायदा विनापास परमीटशिवाय देशी विदेशी दारुचे बाटल्या चोरटी विक्री करण्याचे उद्देश्याने बाळगुन तसेच तो स्वता: व काही लोक आपले स्वता:च्या फायदयासाठी झन्ना मन्ना नावाचे पत्ता जुगारावर पेसे लावुन मांग पत्त्यावर जुगाराचा खेळ खेळीत व खेळवित आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. या माहितीनुसार मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आपले सहकारी,पो.ना शरद पाटील, पो.कॉ.सुनील हटकर,पो. कॉ.बापू साळुंके,पो. कॉ. संजय पाटील, पो. कॉ. प्रमोद पाटील,यांच्या सह धाड टाकली असता जागेवर वरील सर्व गोष्टी आढळून आल्या.
मिळालेल्या बातमीनुसार आडोशाला उभे राहून पोलिसांनी दुरुन खात्री करता सानेगुरुजी कॉम्पलेक्स मधिल बंदिस्त गाळा क्रमांक 06 गिंताजली फुटवेअर नावाचे दुकानात काही लोक एका टेबलला घोळका करुन टेबलवर पैसे टाकतांना दिसले सदरचे लोक पत्ता, जगार खेळत असल्याची खात्री झाल्याने पत्ता जुगार खेळणारे इसमांवर 21 . 30 वाजता छापा टाकून पत्ते खेळणाऱ्यांना जागीच पकडले . पत्ते खेळणारे ईसमांची पंचासमक्ष अंगझडतीत पत्ता जुगाराचा साधने व रोख रुपये मिळुन आले. एक 52 पत्त्याचा कॅट- 12000 रुपये टेबलवर घोळातमिळुन आलेले रोख रुपये, 62 , 000 रुपये आरोपी जिजाबराव भिका पाटील वय 42 रा . अमळनेर याचे अंग झडतीत,5000 / – रुपये आरोपी शेख सबदर शेख इस्माईल वय 68 रा . ईस्लाम पुरा अमळनेर याचे, 6000 / – रुपये आरोपी प्रकाश बाबुराव कोतकर वय 69 रा . फ्लॅट नं 2 यश अपार्ट मेंट जुने रेस्ट हाउस अमळनेर याचे अंग झडतीत मिळून आले .
1800 रुपये किमतीची रॉयल चॅलेंज कंपणीची प्रत्येकी 180 एम एल मापाच्या 210 रुपये किमतीच्या एकूण 9, कंपनी सिलबद बाटली 02 ,840 रुपये किमतीची रॉयल चॅलेज कंपणीची प्रत्येकी 375, एम एल मापाच्या 420 रुपये किमतीच्या एकुण 102 कंपनी सिंलबद बाटली, असा एकूण 87 , 730 / – रुपये किमतीचा ऐवज, आरोपी यांचे कब्जात मिळुन आल्याने ते जप्त करुन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले पंचनामा पोनि अंबादास मोरे यांनी केला.