नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढलं आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे”.