पुणे (वृत्तसंस्था) – खरीप हंगामात घेतलेले पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आली असल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जावर 50 हजार रुपयांची सवलत व शून्य टक्के व्याज दराचा लाभ मिळण्यासाठी बँकेतील गर्दी वाढतच आहे.मार्च अखेरीस पीक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत तुडुंब गर्दी केली आहे. या गर्दीत करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे करोना संसर्गजन्य आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या करोना संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात झाले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना पैशाची जमावाजम करण्यासाठी लॉकडाऊन च्या काळात जाता येत नसल्याने पीक कर्ज भरण्यासाठी शासानाने मुदतवाढ करावी. अशी कर्जदार शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर शेतकऱ्यांसाठी सोसायटीमार्फत खरीप हंगामात पीक कर्जाचे वाटप केले आणि हे कर्ज मार्चअखेरीस नियमित भरण्यासाठीगर्दी केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची सवलत व शून्य टक्के व्याज दराचा फायदा होणार आहे.सध्या या पीक कर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली नसल्याने शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी करत असल्याचे यांनी सांगितले. पीडीसीसीबँकेचे राजगुरूनगर शाखा अधिकारी चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले कि, खरीप हंगामात घेतलेले पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱयांनी शाखेत गर्दी केली आहे. मुदतवाढीबाबत शासनाचे कोणतेही पत्र आले नाही. करोना विषाणू रोखण्यासाठी बॅंकेत येणाऱ्या खातेदारांना सनिटायझर व त्यांच्यात सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेतली आहे. मात्र शेतकरी गर्दी करीत आहेत.