नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या देशात वाढून 17 वर पोहोचली आहे. तर कोरोना बाधितांची संख्यावर 724 वर पोहोचली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी सव्वा नऊ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील बाधितांची संख्या 724 वर पोहोचली आहे. देशात 17 जण बळी पडले असून त्यात महाराष्ट्रातील चार, गुजरातमधील तीन, कर्नाटकातील दोन, मध्यप्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, प. बंगाल, जम्मू आणि काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानात एकाचा समावेश आहे. आज दिवसभरात कर्नाटक आणि राजस्थानात प्रत्येकी एकाच मृत्यू झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. राजस्थानातील भीलवाडा येथील एक 60 वर्षीय वृध्द आणि कर्नाटकातील एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात प्रत्यक्ष बाधित भारतीय 640 असून 66 जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर एक जण आपल्या देशात निघून घेला आहे. तर देशात परदेशी बाधितांची संख्या 47 आहे.कोरोना विषाणूंच्या साथीमुळे देशात घबराट पसरली आहे. केरळमध्ये पहिला बाधीत 30 जानेवारीला सापडल्यानंतर या साथीने आपले पावले देशात पसरायला सुरवात केली आहे. त्यामुळे 700 पेक्षा अधिक लोकांना बाधा झाली आहे.जगभरात 20 हजारहून अधिक बळी घेणाऱ्या या साथीमुळे जगभरातीाल सरकारांनी तीन अब्जपेक्षा अधिक लोक लॉक डाऊनमध्ये अडकले आहेत. चीन आणि इटलीला याचा सर्वाधिक फटका बसला असला तरी भारतही त्याच्या तावडीत सापडला आहे. केरळमध्ये पहिला बाधित सापडल्यानंतर देशभरात सर्वत्र त्याची लागण झालेले सापडू लागले.