मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.
रामायण मालिकेचा पहिला भाग शनिवारी सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची.
Prakash Javadekar
✔
@PrakashJavdekar
जनता की मांग पर कल शनिवार 28 मार्च से ‘रामायण’ का प्रसारण पुनः दूरदर्शन के नेशनल चैनल पर शुरू होगा। पहला एपिसोड सुबह 9.00 बजे और दूसरा एपिसोड रात 9.00 बजे होगा । @narendramodi
@PIBIndia@DDNational
60.3K
9:08 AM – Mar 27, 2020
Twitter Ads info and privacy
20.9K people are talking about this
दरम्यान, आता रामायण मालिकेनंतर आणखी एक मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहे. अभिनेता मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेला ‘शक्तिमान’ हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.