लडाख (वृत्तसंस्था) – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे

चिनी विमानांची प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत.







