न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाचा संसर्ग झाल्याने १ हजार ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी आकडेवारी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने रविवारी रात्री उशीरा जाहीर केली. अमेरिकेत आता कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा ५४ हजार ८४१ वर पोहोचला आहे तर ९ लाख ६४ हजार ९३७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. संसर्ग झालेल्यांची आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही अमेरिकेतच सर्वाधिक आहे. तर भारतात विचार करायचा झालाच तर भारतात कोरोना बाधितांचा आकडा हा २७ हजारांवर पोहचला आहे. आरोग्य विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत २७ हजार ८९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामधील २० हजार ८३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६ हजार १८५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.