जळगाव – ( प्रतिनिधी )

जळगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी प्रसंगी घडलेल्या लाजिरवाण्या घटनेचा निषेध म्हणून व्यंकैय्या नायडू ला आज जय भवानी जय शिवाजी लिहून पत्रे पाठवली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार करत विरोध दर्शविला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी महाराष्ट्र राज्यामधून नायडू यांना 20 लाख पत्रे जय भवानी जय शिवाजी लिहून पाठविण्यात येतील असे घोषित केले होते. जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तफेंं 50 हजार पत्र पाठविण्यात येणार आहेत. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, उपाध्यक्ष नितीन जाधव , सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार ,
कल्पेश पाटील, जयेश पाटील, महेंद्र नागरे , जयेश नेवे, ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव पोस्टऑफिस येथून पत्र पाठवून नायडू यांचा निषेध करीत जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.







