जळगाव (प्रतिनिधी) – राजर्षी शाहू महाराज यांच्या जंयतीनिमित्त दि. २६ जून रोजी सामाजिक न्याय दिवस जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ झालेल्या एका जोडप्याचा प्रातिनिधीक स्वरूपामध्ये पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन गौरव करण्यात आला. आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान माहे मार्च २०१८-१९ मधील प्राप्त १६० प्रस्ताव केंद्र हिस्सा अप्राप्त असल्याने प्रलंबित होते. मा.पालकमंत्री महोदय व सभापती महोदय समाज कल्याण यांनी पाठपुरावा केल्याने केंद्र हिस्सा प्राप्त झाल्यानंतर प्रती जोडपे र.रू ५० हजार प्रमाणे १६० जोडप्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.आर .लोखंडे उप.मु.का.अ (पा व स्व) यांनी केले.
याप्रसंगी जि.प अध्यक्षा मा.रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष श्री लालचंदभाऊ पाटील, समाज कल्याण समिती सभापती श्री जयपालभाऊ बोदडे, जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील , प्रभारी अति.मु.का.अ श्री विनोद गायकवाड ,श्री योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगांव, श्री कमलाकर रणदिवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा.प्र.वि, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सोशल डिस्टसींगचे नियम पाळून कार्यक्रमास उपस्थित होते. प्रलंबित अनुदान मिळाल्याने जोडप्याने आनंद व्यक्त केला.







