मुंबई (वृतसंस्था) – कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक कंपनींचं कंत्राट इथल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदारांच्या गॅंगला बाहेरचा माणूस नको असतो, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ असंही देशपांडे यावेळी म्हणाले.







