अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तसेच बुलडाणा जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा “राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार” तसेच “जिजाऊ कन्या पुरस्कार” ,शूर तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील नारीशक्तीला च्या सबलीकरनाचे विविध आयाम आहेत. . अाज वेगवेगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली अाहेत. काेणतेही क्षेत्र त्याला अपवाद नाही. ८ मार्च हा दिवस यशाच्या अवकाशात *उडान* भरणाऱ्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याने व तिला सलाम ठोकण्याचा दिवस असल्याने येथील दिव्या फाउंडेशनच्या वतीने “उडान” नारीशक्तीची भरारी… या कार्य गौरव कार्यक्रमात तसेच अत्यन्त दिमाखदार सॊहळ्यात अमळनेर येथील प्रा जयश्री दाभाडे यांचा देखील शूर तेजस्विनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आत्मसन्मानाचा, आणि तिच्या कसोटीचाही उत्सव आहे. याच अनुषंगाने दिव्या फाउंडेशन अंतर्गत गर्दे हॉल येथे पार पडला. कार्यक्रमाला अर्जुन पूरस्कार प्राप्त ललिता बाबर, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमांन चंद्रा,उपविभागीय पोलिस अधिकारी गौरी सावंत,सह आयुक्त जी.एस.टी स्वाती थोरात, पतीच्या जीवन संघर्षासाठी ६५ वर्षीय मॅरेथॉन धावणारी आदर्श पत्नी लता भगवान करे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे, डॉ. प्रचीती पुंडे,चला हवा येऊ द्या फेम चैताली मानकर जिल्हा महिला न्यायाधीश,समाजसेविका पुणे माधुरी संतोष बारणे यांची विशेष उपस्थित होते. ३ ते ४ सत्रात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील सतत कार्यरत असणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रा जयश्री दाभाडे ह्या गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक मोर्चे आंदोलने यांच्या मार्फत समाजातील गरजू वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. प्रा दाभाडे ह्या वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून सामाजिक बांधीलकी जपत अनेक कुटुंबाचे समुपदेशन करून समेट घडवून आणला आहे.शहरातील बालविवाह थांबविण्या पासून ते थेट रेशन भ्रष्टाचार, वाळू माफिया यांच्याशी टक्कर घेत भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. विविध पदांवर कार्यरत असताना समाजातील आदिवासी,बहुजन, दलित घटकातील सामान्य जनता न्याय मागण्यासाठी बिनधास्त आणि निःसंकोचपणे प्रा दाभाडे यांच्या कडे धाव घेते.निस्वार्थी कार्य, डॅशिंग व्यक्तिमत्त्व, बिनधास्त रोख ठोक स्वभाव, निस्पृह पणा, मना पासून कामात झोकून देण्याची तयारी या सर्व गोष्टी मुळे प्रा दाभाडे ओळखल्या जातात. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, पुरस्कार कामाची घेतली जाणारी दखल, संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली ओळख यामुळे पुन्हा कामांची जबाबदारी वाढते,लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही नैतिक जबाबदारी खांद्यावर येते आणी पुन्हा कार्य करण्यासाठी प्रेरणा उत्साह वाढतो. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे परन्तु ते करण्यासाठी मन खुप मोठं असावं लागतं आता पर्यंत मिळालेल्या पुरस्कारांनी खूप ऊर्जा दिली असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.प्रा दाभाडे या सध्या पत्रकारिता देखिल करीत आहेत आणि निर्भीड पणे वास्तव आणि सडेतोड बातम्या लावणाऱ्या भाषेला तलवारीची धार असणाऱ्या त्या एकमेव महिला पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.या सोहळ्यात महिला सह महाविद्यालयीन मुली, ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.