नागपूर (वृत्तसंस्था) – नागपुरात आज सकाळी एका संशयित व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नागपूरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 106 वर पोहचली आहे. 26 वर्षीय तरुण असून हा आधीपासूनच मेयो रुग्णालयात दाखल आहे. काल दिवसभरात शहरात 7 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूरात कोरोना रुग्णसंख्येने शुक्रवारी शंभरी गाठली होती. नागपूर – 25 एप्रिल – सकाळी, एकूण पोजिटिव्ह नमुने – 106, मृत्यू – 01, रुग्णालयातून बरे होऊन सुट्टी – 17, रुग्णालयात उपचार सुरू – 88