बुलडाणा – नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रायणी गोमासे यांनी तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण आहे. पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून यशाचं शिखर गाठलं आहे.
इंद्रायणी यांच्या लग्नानंतर पती सीआरपीएफमध्ये दाखल झाले. ते सध्या छतीसगड येथील बस्तर येथे देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही, सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं.
कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यलयात नोकरी मिळवली. तर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचू शकतील, नाही तर शेतीवर अनेक संशोधन केली जातात. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या करता एवढ्यावरच न थांबता इंद्रायणी यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणे येथून खासगी शिकवण्यातून स्वतः अभ्यास करून राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी या प्रवर्गातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावून आता त्या तहसीलदार झाल्या आहेत.







