चिनी घुसखोरांचा निषेध

तात्काळ चीनी घुसखोरांना प्रत्युत्तर द्या, देश हिताच्या निर्णयासाठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्या मोदींसोबत
जळगाव– ( प्रतिनिधी ) सोमवारी भारत आणि चीन यांच्या दरम्यान लदाखच्या गलवान सीमेवरील झालेल्या संघर्षामध्ये भारत देशाचे 20 वीर जवान शहीद झाले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी देशाच्या वीर जवानांना भावपूर्ण शब्दांजली वाहून चिनी घुसखोरांचा निषेध केला.
1899 मध्ये सर्वप्रथम गुलाम रसूल गलवान या व्यक्तीने लडाखच्या भुभागांमधील या 1400 फूट खोल अशा घाटीचा व तेथून वाहणार्या नदीचा शोध लावला. तेव्हापासून या घाटी ला त्या व्यक्तीचे नाव म्हणून “गलवान खोरे” म्हणून ओळखल्या जाते.
गलवान घाटी व नदी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
परंतु जबरदस्ती भारतामधील या घाटीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न चिनी घुसखोर भरपूर वर्षांपासून करत आहे . आता हा संघर्ष अति गंभीर परिस्थितीमध्ये आलेला आहे.
या आधी 1962, 1975 व आता 2020 अशा तीन वेळेस भारत आणि चीन मध्ये गलवानवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष पेटलेला दिसून आलेला आहे. आता चीन मधूनच आलेल्या कोरोणा या महामारी आजाराशी संपूर्ण भारत देश लढा देत असताना, अचानक चिनी घुसखोरांनी सोमवारी गलवान खोऱ्यामध्ये पुसण्याचा प्रयत्न केला.
परंतु भारताच्या जवानांनी लढा देत त्यांचा हा कट हाणून पाडला. जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की, आता चीनला व चीनी घुसखोरांना प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे.
चिनी घुसखोरी विरोधात आपण घेतलेल्या कठोर निर्णयांमध्ये काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या सोबत राहील व आपल्याला सहकार्य करेल







