उद्या सायंकाळी घेणार पदभार

जळगाव ( प्रतिनिधी ) सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजित राउत यांची बदली जळगाव चे नवे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे . उद्या सायंकाळ ते आपल्या या पदाची सूत्रे विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडून स्वीकारतील .

अभिजित राउत यांच्या जळगावी करण्यात आलेल्या बदलीचे आदेश नुकतेच राज्य शासनाचे अप्पर मुख्य सचिव ( सेवा ) यांनी जारी केले आहेत . विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची बदली कुठे झाली हे मात्र लगेच समजू शकले नाही
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, राज्याच्या तुलनेत सर्वाधिक मृत्युदर , कोरोना रुग्ण महिलेचा शासकीय रुग्णालय महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात सापडलेला मृतदेह, 80 कोरोना रुग्णांचे स्वाब आणि यादी गहाळ होणे , गरव्यवहाराचे संशय आदी कारणांच्या पार्शवभूमीवर जिल्हा प्रशासन आणि शासकीय रुग्णालय जनतेच्या संतापाचे कारण ठरले होते . अधिष्ठाता आणि तीन डॉक्टरांना निलंबित केल्यांनतर आता राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे . आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर अनाठायी विसंबून राहणे जिल्हाधिकारी ढाकणे यांना भोवले असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु आहे







