जळगाव (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित, शहरी बेघर निवारा गृह येथील वृद्ध लाभार्थ्यांकारिता रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे ५० खुर्चीचे वाटप करण्यात आले. या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, सदस्य दीपक जोशी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ ३०३० चे असिस्टंट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. तुषार फिरके, अनिल अग्रवाल, क्लब अध्यक्ष सागर मुंदडा, सचिव करण ललवाणी, धनराज कासट, अश्विन मंडोरा, दिलीप रंगलानी, नीरज अग्रवाल, जिनल जैन, सचिन बलदवा यांच्यासह दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या समन्वयिका गायत्री पाटील, सागर येवले, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्ष सागर मुंदडा यांनी आगामी वर्षात रोटरी क्लब ऑफ स्टार्सच्या सर्व सदस्यांचा वाढदिवस बेघर निवारा गृहात साजरा करण्यात येईल. सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नीळकंठ गायकवाड यांनी रोटरी क्लब ऑफ स्टार्सच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. सागर येवले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजी वाहक चेतन हिवरे, राजेंद्र मराठे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ स्टार्सच्या सदस्यांनी सहकार्य केले.शहरी बेघर निवारा गृहास खुर्च्यांचे वाटप करताना नीळकंठ गायकवाड, दीपक जोशी, डॉ. तुषार फिरके, अनिल अग्रलवाल आदी.