अमळनेर (प्रतिनिधी) – येथील प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी आज पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक व आरोग्य अधिकारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली.
यावेळी अहिरे यांनी सांगितले की , सर्वांनी धार्मिक, सार्वजनिक तसेच गर्दी होणारे खाजगी व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवावेत .कोठेही गर्दी करू नका .गर्दीत जाऊ नका. बाहेरगावच्या लोकांविषयी माहिती घ्या. खासकरून परदेशातून आलेल्यांबाबत विशेष दक्ष राहा. ही माहिती तुमच्या वॉर्डातील सर्वांना सांगा. सर्वांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करा.
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील म्हणाले की, आम्ही पालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय आदेश येण्यापूर्वीच घरोघर जनजागृती करणारे पत्रके वाटली आहेत. मोठे बॅनर शहरात मुख्य ठिकाणी लावले आहेत. लग्नालाही मोजक्याच लोकांना बोलवावे यासाठीही जनजागृती करणारी पत्रके वाटली आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी कोरोनाची लक्षणे ,प्रतिबंध व उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे , मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड ,नगरसेवक नरेंद्र संदानशिव, राजेश पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण पाठक,सुरेश पाटील,निशांत अग्रवाल, राधाबाई पवार,शीतल यादव,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, विक्रांत पाटील,साखरलाल महाजन,फयाजखां पठाण,संतोष लोहेरे,राजेंद्र यादव,रवी पाटील,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण,संतोष बिऱ्हाडे, प्रमोद लटपटे उपस्थित होते. संजय चौधरी यांनी आभार मानले.