नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – १ जुलै पासून बँकेचे काही नियम बदलणार आहेत. हे नियम लक्षात नाही घेतले तर निश्चितच तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. एटीएममधून पैसे काढण्यापासून तर खात्यात कमीत कमी किती रक्कम शिल्लक ठेवता येईल इथपर्यंतच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल बँकेकडून केले जाणार आहेत.

अर्थ मंत्रालयाने एटीएममधून पैसे काढण्याठी सर्व ट्रान्झॅक्शन शूल्क हटवण्यात आले होते. कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भार येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला होता. 3 महिन्यासाठी देण्यात आलेली ही सूट 30 जून 2020 रोजी संपत आहे.
कोरोना काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी घोषणा केली होती की, तुमच्या खात्यामध्ये निश्चित कमीतकमी बॅलन्स ठेवणे अनिवार्य नसेल. एप्रिल ते जून या महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कमीतकमी शिल्लक नसल्यास दंड आकारण्यात येणार नव्हता. मात्र आता ही सूट 30 जून रोजी संपणार आहे.
पंजाब नॅशनल बँक (PNB)ने बचत खात्यावरील (Saving Account)मिळणाऱ्या व्याजदरामध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. एक जुलैपासून पीएनबीच्या बचत खातेधारकांना वार्षिक केवळ 3.25 टक्के व्याज मिळेल. याआधी देशातील मोठ्या बँकांपैकी एसबीआय आणि कोटक महिंद्रा या बँकानी देखील व्याजदरामध्ये कपात केली आहे.







