जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आलेल्या प्राप्त अहवालानुसार आज नव्याने पुन्हा २ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .

आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या २७ वर जाऊन पोहचली आहे. शिरसोली प्र. बो. येथील एका १६ वर्षीय मुलीचा व जळगाव जिल्हा कोविड १९ हॉस्पिटलला अँडमिट असलेल्या एका ६७ वर्षीय इसमाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शिरसोलीमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शिरसोली मध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसेन दिवस जास्त वाढत असुन याबाबत दोन्ही गावातील ग्रामपंचायत व नागरिक सात दिवस संपूर्ण शिरसोली बंद पुकरणार आहे. परंतु यासंदर्भात दुकाने बंद ठेवले असून बाहेर चौकाचौकात ४ ते ५ जणांचा ग्रुप करून बसत आहे. याकडे मात्र बंद पुकारणाऱ्या ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसत आहे.







