मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या संपूर्ण देशाचे युद्ध कोरोना या विषाणूशी सुरु आहे. शासन प्रशासनाकडून नागरिकांना बाहेर न जाण्याचे सतत आवाहन केले जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलिस सर्वजण आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील ते स्वत: दक्षिण कराड मतदारसंघात जाऊन लोकांना या आजाराचे गांभीर्य पटवून देत घ्यावयाच्या दक्षतांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून आवाहन करत आहेत. यामुळे चव्हाण यांना लोकांशी संवाद साधताना बऱ्याच अडचणी जाणवल्या.
याबाबत चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणतात, ‘प्रदेशात ५०,००० वर भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, त्यापैकी ५,००० ते ७,००० हजार विद्यार्थी महाराष्ट्रामधील आहेत. त्यांचे जेवणाचे व राहण्याचे हाल चालले आहेत. त्यांना विमानाने भारतात आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा,’ अशी मागणी चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.
दरम्यान, ‘केबल कंपन्यांना विनंती करून केबल कंपन्यांचे दर पुढील तीन महिन्यांकरिता कमी करण्यात यावे. तसेच wifi ची व्यवस्था ही आज जीवनावश्यक गरज झाली आहे. त्यांचे दर ही पुढील तीन महिन्यांकरिता कमी करावयास टेलिकॉम कंपन्यांना सांगावे,’ अशी देखील मागणी चव्हाण यांनी केली आहे.







