जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये सिंचन विभागातील कर्मचारी सहा.लेखाधिकारी सुरेंद्र अहिरे रा. जळगाव यांना नाशिक लाचलुचपत विभाग पोलिस अधीक्षक सुनील कडासने मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक पालकर चंद्रसेन बी.पोलीस निरीक्षक सपकाळे , पोलीस नाईक प्रवीण महाजन, पोलीस नाईक प्रकाश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल पगारे यांच्या पथकाने जिल्हा परिषद इमारतीमध्ये कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी सुरेंद्र अहिरे यांनी फिर्यादी ठेकेदाराकडून कामाच्या बिल पास करुन देण्या पोटी रुपये चाळीसगाव येथील फिर्यादी यास रुपये 15000 ची मागणी केली असता रोख 13000 घेतांना आज नाशिक येथील लाचलुचपत विभागाने जळगाव जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यालयांमध्ये फिर्यादीने समक्ष पैसे देताना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून अधिकाऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.