जळगाव – शहरतीाल मंगपुरी येथील रहिवासी अभिषेक नंदलाल शर्मा (वय-28) या तरुणाचा मेहरुण तलावात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी घडली. एमआयडीसी पेलिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अभिषेक त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने तो खोल पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या सोबतच्यां मित्रांनी दिली.
मंगलपुरी येथील रहिवासी अभिषेक नंदलाल शर्मा (वय-28) या तरुणाने दुपारी मेहरुण तलावात बुडाला. प्रत्यक्षदर्शींनी आरडा ओरड केल्यावर पोहणाऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आसीम सैय्यद, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील अशांनी धाव घेतली. तलावात बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी राजेंद्र श्रावण शेजवळ (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), सलमान खान युसूफ खान, (रा. रामनगर जळगाव), किरण जगदीश नाईक, (रा. मेहरून जळगाव), भूषण श्याम तायडे, (रा. जळगाव), रामदास शिवाजी भोस, (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव), निलेश गोविंदा पाटील या पोहणाऱ्यांनी उडी घेत मृतदेह शोधुन बाहेर काढला.
कुटूंबीयांचा आक्रोश
अभिषेक तलावात बुडाल्याची माहिती मिळतांच कुटूंबासह परिसरातील रहिवाश्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. मृतदेह शोधून पोहणाऱ्यांनी बाहेर काढताच कुटूंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.