हिंगोणा ता यावल
येथील गावातील २६ वर्षीय मुलगी भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात कामास आहे परंतु ती १ महीन्यापासुन रुग्णालयात कामाला गेलीच नव्हती व काही दिवसांनी तीला सर्दी खोकला ताप चा त्रास सुरू झाल्याने ती स्वतः भुसावळ येथे जाऊन स्वॅब देउन आली होती आणी आज ४ दिवसांनी तिचा रीपोर्ट पॉझीटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा खळबड्डन जागे झाली व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तडवी तलाठी दिपक गवई सरपंच महेश राणे ग्राम विकास अधिकारी देवानंद सोनवणे कोतवाल सुमन आंबेकर पोलीस पाटील दिनेश बाविस्कर आरोग्यसेविका ज्योति भवरे बोरखेडा खु . ग्रामसेवक हितू महाजन हे तातडीने दाखल झाले व सदर परीसर हा सील करण्यात आला आहे सदर रुग्णाला फैजपुर येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या कुंटबातील तीन लोकांना फैजपुर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपली व आपल्या परिवाराची काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे ग्रामपंचायतीकडून कळविण्यात आले आहे