मुंबई (वृत्तसंस्था) – माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर तुझा काळा धंदा बाहेर काढीन’ असा इशारा बाॅलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याने टी.सिरीज चे सर्वेसर्वा भुषण कुमार यांना दिला आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बाॅलिवूडमधील गटवाद समोर येत असताना सोनू संगीत क्षेत्रातील काळी बाजू उघडी पाडत आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सोनू म्हणाला, भाई माझ्या तोंडी लागू नकोस. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेत आहेस, तुला आठवत असेल तू माझ्या घरी यायचास.. स्मिता ठाकरेशी माझी गाठ घालून दे, बाळासाहेब ठाकरेंना मला भेटायचं आहे. असा म्हणायचास. मला आबू सालेम धमक्या देतोय, मला वाचव. अशी विनवणी करायचास.
‘माझ्या नादी लागलास तर मरिना कंवरचा व्हिडीयो मी युट्यूबवर अपलोड करेन’ असा धमकीवजा इशाराच सोनूने भुषण कुमार यांना दिला आहे. सोनूने नुकताच भारतातील बड्या संगीत कंपन्यांनावर गंभीर आरोप लावले होते. यामध्ये भूषण यांच्या ‘टि सिरीज’चाही समावेश होता.
बाॅलिवूडच्या एका कलाकाराने नुकतीच आत्महत्या केली. उद्या एखादा गीतकारही आत्महत्या करू शकतो. बाॅलिवूड चित्रपटांपेक्षा संगीतात अधिक माफिया बघायला मिळतील. गायकाला बाॅलिवूड क्षेत्रात घ्यायचं की नाही हे सध्या दोनच व्यक्ती ठरवत आहेत. मी यावर मात केली. मात्र नवीन गीतकारांना याचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. असंही सोनूने व्हिडीयोमध्ये स्पष्ट केलं आहे.







