मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)- मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती व कुर्हा येथील रहिवाशी डी. ओ . पाटील यांच्या हत्येची सुपारी देणार्या व त्यांच्यावर हल्ला करणार्या मारेकरी आरोपींना न्यायालयाने 27 जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली होती. 17 जूनरोजी रात्री 2:30 ते सकाळी 5 : 00 वाजेच्या दरम्यान कुर्हा येथील व्दारका किसान पेट्रोलपंप आवारात फिर्यादी गजानन पाटील यांचे चुलत भाऊदिनकर पाटील ( मुक्ताईनगर पंचायत समिती माजी सभापती ) झोपलेले असताना त्यांना अज्ञात इसमाने धारदार हत्याराने गळयावर वार करुन ठार मारले होते. मयत हे डी ओ पाटील नावाने परिचीत होते. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुरन. 118/2020 भादवि.क.302, 120(ब), 201 सह आर्म अँक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळाची पाहणी करुन नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक बापु रोहोम , पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना तपासाबाबत सुचना देवुन पथके स्थापन केली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा खुन पुर्व वैमनस्यातुन झाला .त्याअनुषंगाने पथकांनी तपास केला त्यात सुपारी देवुन हत्या केली आहे, असे निष्पन्न झाले.
आरोपी तेजराव पाटील ( ग्रामपंचायत सदस्य, 49, ) व विलास महाजन ( 51, दोन्ही रा- वार्ड नंबर 4 कृर्हा ता.मुक्ताईनगर) यांनी गावातील वर्चस्व टिकवण्याचे हेतुने सैय्यद साबीर सैय्यद शफी ( 29 रा. नवीन मशिद जवळ कॄर्हा) यांचे मदतीने आरोपी निलेश गुरचळ ( 30 , हिस्ट्रीशिटर, रा.नाडगाव ता.बोदवड ), अमोल लंवगे ( 27, रा.नाडगाव ता.बोदवड ) यांना 2 लाख 50 हजार रुपयांची सुपारी देऊन मयताचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक करुन 27 जूनपर्यंत पोलीस कस्टही मिळाली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.








