नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लडाख खोऱ्यात चीन आणि भारतात तणावाची परिस्थिती आहे आणि गलवान खोऱ्यात चकमकीच्या वेळी भारतीय सैनिक शाहिद झाल्याने हे वातावरण आणखीनच तापले आहे. दरम्यान, चीनच्या खोटेपणाचा पर्दाफाश करण्यासाठी एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये चीन हेतुपुरस्सर वातावरण कसे खराब करतोय, हे दिसून आले आहे. अमेरिकन इंटेलिजेंसच्या या अहवालात चीन सत्य लपवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
1. भारतीय सैनिकांवर चीनचा हल्ला ही पूर्वनियोजित चाल होती. चिनी सैन्याचे वेस्ट थिएटर कमांड प्रमुख जनरल झाओ झोंग्की यांनी भारतीय सीमेवर ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
2. चिनी सैन्याने आपल्या ठार झालेल्या सैनिकांसाठी मेमोरियल सर्विस ठेवली, पण ते कोणाच्याही समोर येऊ दिले नाही, त्या संबंधित व्हिडिओ-फोटो सोशल मीडियावर काढून टाकले गेले.
3. जनरल झाओ झोंग्कीने यापूर्वी व्हिएतनामच्या युद्धात आणि त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या झालेल्या डोकलाम वादामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
4 . चीनने आधीच अशाप्रकारच्या चकमकीचे नियोजन केले होते, ज्यात त्याचे सुमारे 35 सैनिक ठार झाले होते. भारत आपल्या सभोवतालच्या देशांमध्येच अडकून राहिला पाहिजे, जेणेकरून अमेरिकेपासून अंतर तयार होईल, अशी चीनची इच्छा आहे.
5 . चीनने गलवान खोऱ्याजवळ बर्यापैकी शस्त्रे जमा केली असून आपल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. 15 जूनच्या घटनेबाबत म्हंटले आहे की, जेव्हा काही भारतीय अधिकारी आणि सैनिक चीनशी बोलण्यासाठी आले होते, तेव्हा चिनी सैनिक आधीच शस्त्रास्त्रे घेऊन बसले होते, त्यानंतर त्यांनी हल्ला केला. इतर भारतीय सैनिक जेव्हा बचावासाठी आले तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली.
6 . चीनने जसे नियोजन केले होते तसे घडले नाही. एवढेच काय चीन सरकारच्या अधिकृत मीडियानेही याबद्दल फारसे प्रकाशित केले नाही.
7. या घटनेबद्दल चिनी सोशल मीडियावर जे काही लिहिले गेले होते त्यावर चीनने सेन्सॉर केले. आपले जास्त नुकसान होणार नाही, असे चीनला वाटत होते. परंतु 35 हून अधिक सैनिक ठार झाले.
8 . 15 जूनच्या घटनेनंतर चिनी माध्यमांनी भारतावर हल्ला आणखी तीव्र केला. पण जेव्हा हा अहवाल समोर आला, तेव्हा त्यांच्या बाजूने जरा हलकी भूमिका स्वीकारली गेली.
9. अहवालानुसार, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने संपूर्ण चकमकीचा दोष भारतावर दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की भारतीय सैनिकांनी एक निश्चित सीमा ओलांडली, त्यानंतर चीनने आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सुरवात केली.
10 . अमेरिका या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवून आहे, भारत हा त्याचा साथीदार आहे, अशा कठीण परिस्थितीत अमेरिका त्याच्या पाठीशी उभा आहे. परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही चीनला कठोर संदेश दिला आहे.