नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काही दिवसापूर्वी अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र आता मांजरालाही कोरोनाची बाधा झाली आहे. माणसांमुळे इतर प्राण्यांना देखील कोरोनाची बाधा होऊ शकते यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. न्यूयॉर्क शहरातील दोन मांजरीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त इंडिया ‘टुडे’ने दिले आहे. या बातमीमुळे चिंता निर्माण झाली आहे.
प्राण्यांना कोरोनाची बाधा होत असल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आहेत अशा भागात पाळीव प्राण्यांना जाऊ देऊ नये असं डॉ. अश्विनीकुमार यांनी सांगितलं. पाळीव प्राणी बाहेर काही खात असेल त्या त्यांच्यावर नजर ठेवा असा सल्ला देखील त्यांनी दिला. दरम्यान, काही दिवसापूर्वी अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाली होती. प्राणी संग्रहालयातील एखाद्या कर्मचाऱ्यामुळे वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे प्राणिसंग्रालय प्रशासनाने सांगितले होते. या घटनेनंतर पर्यटकांसाठी प्राणिसंग्रलाय बंद ठेवण्यात आले आहे.







