नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. त्यामुळे कलाक्षेत्राला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. या गंबीर परिस्थितीत बॉलिवूड विश्वासह इतर क्षेत्रातील मंडळी देखील कोरोनाविरोधातील युद्धात पुढे सरसावत आहेत. तामिळ चित्रपट विश्वातील सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांनी देखील आता मदतीचा हात पुढे केला आहे.एका प्रसिद्ध वृत्तानुसार, रजनीकांत दक्षिण भारतीय आर्टिस्ट असोसिएशनच्या (नदीगर संगम) सुमारे हजारो कलाकारांना किराणा सामान उपलब्ध करून देणार आहे. यामुळे कोरोना युद्धादरम्यान संकटात सापडलेल्या कलाकारांच्या कुटुंबास मोठी मदत होऊ शकते.दरम्यान, यापूर्वी देखील रजनीकांत यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.