न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे. त्यातच अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर हल्ला केला आहे. हा काही फ्ल्यू नाही. हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका मांडली. आमच्यावर हल्ला झालाय. हा काही फ्ल्यू नाही. आतापर्यंत कोणीच भूतकाळात असे काही पाहिलेले नाही. त्यामुळे हा हल्लाच असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेमध्ये आतापर्यंत अमेरिकेमध्ये ४७ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८,५२,००० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.
अमेरिकेत कोरोना संक्रमणामुळे बेरोजगारांसाठी आणि उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पण त्यामुळे तेथील सरकारवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील उत्तर दिले.