• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समन्वयकाच्या भूमिकेतून नागपूर पोलिसांची तब्बल 15 लाख लोकांपर्यंत मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2020
in महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाच्या घराबाहेर पडण्याला निर्बंध आले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना व न ऐकनाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करत असतानाच नागपुरात एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही यासाठी नागपूर पोलिसांची संवेदनशीलता त्यांच्या कृतिशील उपक्रमातून दिसत आहे. अन्नदान, धान्यवाटप, जीवनावश्यक आदी वस्तूंचे वाटप करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना एकत्र करुन समन्वयकाच्या भूमिकेतून 15 लाख लोकांपर्यंत मदत वाटप सुरु आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतानाच लॉकडाऊनमुळे असंख्य नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासोबतच जिल्ह्याची सीमाबंदी केल्यामुळे हजारो मजूर आहे तिथेच अडकून पडले. या पार्श्वभूमीवर शासनाने निवासगृहे सुरु केली. परंतु हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. सामाजिक जबाबदारी स्वीकारत विविध स्वयंसेवी संस्थांनी मदत सुरु केली. परंतु ही मदत एका विशिष्ट भागापुरतीच मर्यादित राहत असल्यामुळे नागपूरचे अप्पर पोलीस महानिरीक्षक निलेश भरणे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्थांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ‘पोलीस वॉर रुम’ तयार करण्यात आली. पोलीस ‘वॉर रुम’च्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील गरीब व गरजवंत वस्त्यांचे विधानसभा क्षेत्र निहाय वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये रेड, ऑरेंज व ग्रीन अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील नोंदणी केलेल्या 132 संस्थांच्या मदतीची विभागणी करण्यात आली. या संस्थांमार्फत दररोज 95 हजार ते एक लक्ष लोकांपर्यंत शिजविलेल्या अन्नासह विविध साहित्यांचे वाटप होत आहे.
नागपूर पोलिसांचा सायबर सेल हा सामाजिक संस्थांसाठी (एनजीओ) वॉर रुम बनले आहे. त्यासाठी दोन सहायक पोलीस अधिक्षक, सात पोलिस कर्मचारी भुकेल्यांपर्यंत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी अविरत नियंत्रण करत आहे. लॉक डाऊनमुळे शहरातील मजूर आणि कामगार वर्गाचे उपासमार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी या संपूर्ण मानवी कार्यात समन्वयक बनण्याचे ठरविले. शहरातील स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्या संस्थांची यादी तयार करुन त्यांचे व्हॉटस ॲप ग्रुप तयार केले आणि प्रत्येक संस्थेला विशिष्ट भागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार भोजन व धान्याची गरज लक्षात घेऊन माहिती संकलित करण्याचे आणि संबंधित संस्थेला ती पोहचविण्याची जबाबदारी नागपूर पोलिसांनी उचलली आहे. याशिवाय मदत करणाऱ्या संस्थांसाठी 0712-25660214 या हेल्प लाईनवर किंवा नागपूर पोलीसांच्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांचे पत्ते घेवून त्या भागातील सामाजिक संस्थेला ज्यांच्यापर्यंत मदत पोहचवायची आहे त्या बद्दल कळविण्यात येते. 22 मार्च पासून सुमारे 15 लाख लोकांपर्यंत जेवणाचे पॅकेट्स, अन्नधान्य, मास्क, साबन, सॅनिटायझर पोहचविले आहे. विशेष म्हणजे पोलिस या संपूर्ण मदत कार्याची नोंद ठेवत असून सुरुवातीला 30 हजार ते 40 हजार लोकांपर्यंत पोहचणारी ही मदत एक लाख लोकांपर्यंत गेली आहे. केंद्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवले आहे. त्यामुळे नागपूर पोलीस समन्वयकाच्या भूमिकेतून सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने समाजातील अत्यंत गरीब व भुकेल्यांपर्यंत मदतीचे कार्य सुरु ठेवणार आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलीस विभागातर्फे सामाजिक संस्था व मजूर व गरीब जनता यांच्या मधील सेवेच्या समन्वयकाच्या भूमिकेतून काम करत असून अलीकडील काळात ही आजवरची सर्वात मोठी मदत ठरु शकेल आणि कोरोना विरोधातल्या लढ्यात निर्णायकही ठरु शकेल.
भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेला नागपूर शहरातील गरजू आणि गरीब लोकांकरिता मदत करायची होती. पाच लक्ष रुपये कुणाला द्यावे हा प्रश्न पडला. पाच लक्ष रुपये योग्य त्या व्यक्ती करिता खर्च झाले पाहिजे आणि गरीबातल्या गरीब माणसालाच याचा फायदा व्हावा असा आमचा कटाक्ष होता. काही सदस्यांचे मत होत की सरळ कोविड-19 निधीला पाच लक्ष रुपये द्यावे. परंतु काही तरुण आयआरएस सदस्य या मताचे होते की आपल्या डोळ्यासमोर जे गरजू दिसतात त्यांना का सरळ मदत करु नये ? परंतु योग्य संस्था किंवा माणूस कसा ओळखावा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पोलीस अपर आयुक्त निलेश भरणे यांच्या मदतीने 11 योग्य स्वयंसेवी संस्था निवडल्या, ज्या भुकेलेल्यांना अन्न देत होत्या किंवा वैद्यकवीरांना साधन सामुग्री वाटप करीत होत्या. यासाठी नागपूर पोलिसांच्या उपक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. ‘आपण दिलेल्या मदतीचा मानवतेसाठी सुयोग्य वापर होतोय.’ हा अनुभव खास असतो तो आम्हाला नागपूर पोलीस यांच्यामुळे मिळाला.


 

 

Previous Post

24 एप्रिलपासून मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना गहू व तांदूळ वाटप

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जनजागृती, मास्क निर्मिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जनजागृती, मास्क निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon