गोरखपूर, – टीकटॉकवर (tik tok) भन्नाट व्हिडीओ तयार करून एकारात्रीत स्टार झाल्याचे अनेक किस्से ऐकले असतील. पण याच टिकटॉकवर खाकी वर्दीत डान्स करणं दोन पोलीस शिपायांना चांगलंच महागात पडलं आहे. सपना चौधरीच्या गाण्यावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओनंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात सक्त ताकीद देण्यात आली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा हा (tik tok) व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. खाकी वर्दीत या दोघांचा डान्स केलेला टिकटॉक (tik tok) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तुफान लाईक्स मिळाल्या मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताण आणि दबाव वाढल्यानं हा व्हिडीओ कर्मचाऱ्यांना महागात पडला.