जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 1020 वर
जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज दिवस भरात 63 कोरोना रुग्ण बाधित आढळले आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 1020 झाली असून आतापर्यंत 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 478 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि 429 जणांनवर उपचार सुरु आहे. 35 रुग्ण अत्यवस्थ आहेत . ही माहिती प्रशासन तर्फे देण्यात आली आहे.
जळगाव शहर 14, भुसावळ 8, अमळनेर 10, चोपडा 8, भडगाव 1, धरणगाव 7, यावल 3, एंरडोल 1, जामनेर 3, रावेर 6, चाळीसगाव 2, असे एकुण आज 63 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.