पुणे (वृत्तसंस्था) – पूर्व वैमनस्यातून एका महिलेसह तीच्या मुलाला मारहाण करण्यात आली. यावेळी महिलेच्या डोक्यात दगड घालून तीला जखमी करण्यात आले. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात पाच पुरुष व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनिता शेडगे(40,गणेशनगर,एरंडवणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फिर्यादीमध्ये त्यांचा व आरोपींचा पुर्वी एकमेकांकडे बघण्यातून वाद झाला होता.
दरम्यान बुधवारी भांडणाचा आवाज ऐकू आल्याने त्या घराबाहेर आल्या होत्या. यावेळी गल्लीतील काही मुले एकमेकांकडे दगड भिरकावत होती. या आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मुलगा संकेत याला घराबाहेर पाहून त्यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी केले. यामध्ये त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे करत आहेत.