नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी चर्चा केली. हे सर्व अधिकारी कमांडर्सच्या बैठकीसाठी राजधानीत आले होते. त्यावेळी नरवणे यांनी त्यांच्याशी चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेतला. दरम्यान, या आठवड्यात नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
दरम्यान, पिपल्स लिबरेशन आर्मीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात चीनचा एक लष्करी अधिकारी मरण पावल्याचे मान्य केले. भारतासोबत सुरू असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती दिली.
चीनने अद्याप मरण पावलेल्या त्यांच्या सैनिकांची संख्या अधिकृतरित्या जाहीर केली नसली तरी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार ती 45 ते 50 दरम्यान आहे.
दरम्यान चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने चीनने आपली मृतांची संख्या जाहीर केली आणि ती 20 पेक्षा कमी असल्यास भारत सरकारवरील दबाव वाढू शकतो. त्यामुळेच चीन ही आकडेवारी जाहीर करत नसल्याची माहिती दिली आहे.