वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – चीनचा आणखी एक खोटेपणा उघड झाला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठ आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, 24 मार्चपर्यंत वुहानमध्ये 36 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे चीनच्या म्हणण्याप्रमाणे, तोपर्यंत देशात केवळ 700 लोकांचा मृत्यू झाला होता. संशोधनानुसार, वुहानमध्ये फेबु्रवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत रोज 800 ते 2000 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले.
वुहानमध्ये मृतांचा खरा आकडा 14 पट जास्त आहे. वुहानच्या 86 स्मशानांच्या अभ्यासात समजले की, संसर्गाच्या दरम्यान 23 मार्चपर्यंत स्मशानभूमी सतत 24 तास सुरूच होती. 24 मार्चपर्यंत चीनचा आकडा तेव्हा केवळ 2,524 होता. यानुसार, 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले, मार्चच्या अखेरपर्यंत एका स्मशानभूमीने पाच हजार अस्थीकलश खरेदी केले जे 2524 मृतांच्या आकड्यांच्या दुप्पट होता. इतक्या मोठ्या संख्येत कलशांची खरेदी चीनच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित करते. संशोधनातील आकडा वर-खाली होऊ शकतो. परंतु, सरकारी आकडा खरा असूच शकत नाही.







