मुंबई (वृत्तसंस्था) – पालघर हत्याकांड प्रकरणावरून विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनिल देशमुख यांनी विरोधकांना धारेवर धरले. तसेच पालघर प्रकरणातील अटकेत असणाऱ्या १०१ आरोपींची नावे जाहीर केली आहे. अनिल देशमुख म्हणाले कि, ही नावे त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होती. काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या 101 जणांपैकी एकही मुस्लिम नाही. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांचे कान टोचले.पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, दरम्यान, सध्या संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत आहे. मात्र ही लढाई लढत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पालघरची घटना घडल्यानंतर 8 तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे, अशीही माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.