नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासांत करोनाने देशभरात 50 बळी घेतले असून, 1 हजार 383 नवे रुग्ण आढळले आहेत.
यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. यामध्ये रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले 3 हजार 870 तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 640 जणांचा अहवाल आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज डॉक्टर, इंडियन मेडिकल एसोसिएशनच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या दरम्यान, अमित शाह यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी वीडियो कॉनफ्रेंसिंगद्वारे डॉक्टरांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले ‘सरकार डॉक्टरांसोबत उभी आहे. त्यांचा सुरक्षेतसाठी ते सर्व प्रयत्न करतील.’ असं ते म्हणाले आहे.