मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये मुंबईत रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. त्यात मुंबईतील धारावीमधील परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (दि. २२) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आयएमसीटीच्या समितीने धारावीच्या ट्रान्सिट कॅम्प, साई हॉस्पिटल आणि धारावी स्पोर्ट्स क्लबमधील क्वारंटाइन सुविधांची पाहणी केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील होता.








