मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत देशात अग्रभागी आला. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे हे सांगताना इथे कोणतीही विचित्र परिस्थिती नाही हेदेखील आवर्जून सांगितलं होतं.
महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे इथे करोनाचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईत तर जगभरातले लोक येतात. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. याच संदर्भात सोशल मिडियावर सगळ्या लढवय्यांचं मनोधैर्य वाढवणारा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. करोनाविरोधातली लढाई जिंकायचीच आहे हा निर्धार करा असंच या व्हिडीओतून उद्धव ठाकरे सांगत आहेत. तेही एक शब्द न बोलता. अत्यंत सकारात्मक परिणाम साधणारा हा व्हिडीओ शिवसेनेतर्फे पाठवण्यात आला आहे.