जळगाव ( प्रतिनिधी)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रादुर्भाव होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम , सपोनी खलाणे , स.फौ. रविंद्र गिरासे यांना निरामय अँप तयार करणे बाबत सुचना दिल्या होत्या त्यांनी शहरातील सिध्दी साँफ्टवेअर सोल्युशन यांचे कडून निरामय अँप तयार करुन घेतले.
जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे नाव , ब.न. , मोबाईल नंबर , ब्लड ग्रुप, ईमेल आय.डी., जन्मतारीख इत्यादी संपुर्ण डेटा फिड करण्यात येवुन (Niramay- For Jalgaon Police) ह्या नावाने तयार करुन त्याची लिंक ही सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येवुन ते डाऊन लोड करुन घेण्याची सक्ती करण्यात आली. अँप मध्ये ऑक्सीजन पातळी व तापमान पातळी घेण्या करीता सर्व पोलीस स्टेशन व शाखेला थर्मलस्क्रीनींग मशीन व पल्स ऑक्सीमीटर देण्यात आले असुन सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे तापमान पातळी व ऑक्सीजन पातळी ही दररोज चेक करुन त्यांना अँप व्दारे टाकणे बाबत सुचना देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची एक संगणक प्रणाली तयार केलेली असल्याने जिल्ह्यातील सर्वांचे तक्ते तयार होतात व ते तक्ते Add SP , SDPO व पोलीस स्टेशन / शाखा प्रभारी अधिकारी यांना दररोज दिवसातुन दोन वेळेस पुरविण्यात येतात व संबंधीत प्रभारी अधिकारी हे त्यांचे आरोग्यबाबत चौकशी करुन घेवुन पुढील कार्यवाही करीत असतात. कर्मचाऱ्यांना असलेले जुने आजार मधुमेह, उच्च रक्तदाब , हृद्य रोग, फुफ्फुसांचे विकार, किडनी विकार याचा वया नुसार तक्ता
कोवीड – 19 संबंधात असलेली लक्षणे – मध्यम ते तिव्र स्वरुपाचा खोकला , कोरडा खोकला, घसा खवखवणे, श्र्वास घेण्यास अडचण येणे, छातीत दुखणे, अशक्तपणा / अतिसार , तापाची पातळी , ऑक्सीजन पातळी बाबत असलेले लक्षणाचे वया नुसार तक्ता
सिक व इतर सर्व प्रकारच्या रजांचे सुध्दा सदर संगणक प्रणाली मध्ये सविस्तर माहिती तयार होत असुन त्यात नमुद केलेल्या आजारातील कोव्हीड – 19 चे संबंधातील लक्षणे दिसत असल्यास त्यांची सुध्दा माहिती घेण्यात येते.
अधिकारी कर्मचारी यांना सतत 2 दिवस , 3 दिवस , 4 दिवस , 5 दिवस 4 लक्षणे आहेत अशांचा सुध्दा रिपोर्ट येत असतो.
अँप मध्ये ज्यांची ऑक्सीजन पातळी 95 पेक्षा कमी आहे अशांचा सुध्दा तक्ता एका क्लिकवर मिळतो
हे तक्ते एका क्लीकवर मिळत असल्याने तसेच माहिती ही संबंधीत अधिकारी व कर्मचारी हे स्वतः दररोज सकाळी 10.00 वा. पावेतो संकलीत करीत असल्याने माहीत तात्काळ मिळत आहे. सदर तक्त्यांध्ये लक्षणे असलेले अधिकारी / कर्मचारी यांचे संपुर्ण नाव , ब.न., मोबाईल क्र. , नेमणुकीचे ठिकाण व त्यांना असलेली संपुर्ण लक्षणे यांची यादी ही एका क्लीकवर मिळत असल्याने संबंधीतांना स्वतः पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी , नियंत्रण कक्ष अधिकारी स्वतः दुरध्वनीव्दारे फोन करुन चौकशी करीत असल्याने संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना वेळीच उपचार मिळत असल्याने पुढील अनर्थास आळा बसत आहे. अधिकारी व कर्मचारी यांची वरिष्ठ हे स्वतः काळजी घेत असल्याने त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे.
दररोज भरण्यात येणारी माहिती आरोग्य स्थिती अद्यायावत केली जाते मध्यम ते तिव्र स्वरुपाचा खोकला आहे काय , कोरडा खोकला आहे काय, घसा खवखवतो आहे काय , श्र्वास घेण्यास अडचण आहे काय, छातीत दुखत आहे काय, अशक्तपणा / अतिसार याचा त्रास होत आहे काय, ताप आहे काय, ऑक्सीजन पातळी तपासली आहे काय अशी माहिती दरोरोज भरुन घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम , सपोनी खलाणे , सपोनि आखेगावकर, गणेश बुवा , निता कायटे , स.फौ. रविंद्र गिरासे , चंद्रकांत पाटील, विजय पाटील हे.कॉ. नरेंद्र पवार, नरेंद्र वारुळे , दिनेश बडगुजर, श्रीकृष्ण पटवर्धन, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, संदिप साबळे, दत्तात्रय बडगुजर, उदय कापडणे , ज्योती पाटील हे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.