जळगाव ( प्रतिनिधी ) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उद्या ( बुधवार, दि 3 जून ) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वाढलेला मृत्यू दर या पार्श्वभूमीवर या पाहणी आणि संबंधितांशी चर्चे नन्तर ते कोणते निर्णय घेऊन या जिल्ह्याला कसा दिलासा देतात याची सर्वांना उत्सुकता आहे
मंगळवारी रात्री दोन वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोटारीने मुंबईहून शहरातील अजिंठा विश्राम गृहात आगमन होणार आहे बुधवारी सकाळी 9 वाजता सर्वात आधी ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणि त्यांनतर शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देणार आहेत . त्यांनतर ते जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांसह लोकप्रतिनिधी ची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेणार आहेत . त्यांनतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात सूचना देणार आहेत
शहरातील या बैठका आटोपल्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे भुसावळ ला जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहेत भुसावळ येथील पाहणी आणि बैठका आटोपल्यांनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे अकोल्या कडे रवाना होणार आहेत