चाळीसगांव (प्रतिनिधी) – वसुंधरा फाउंडेशन जेसीआय चाळीसगांव सिटी यांच्या संयुक्त विद्यमान डेअरी विभाग व रेल्वे स्टेशन रिक्शा यूनियन येथे कोरोना पासून बचावा करीता मास्क वाटप करण्यात आले.
चाळीसगांव शहर हे डेअरी व्यवसाय करीता प्रसिध्द आहे. शहरात अनेक डेअरी व्यवसाय आहेत. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. अत्यावश्यक सेवा असल्याने बंद राहू शकत नाही. सर्व कामगार बंधुना संरक्षणासाठी मास्क वाटप करण्यात आले. रिक्षा चालकांचा थेट संबंध येणाऱ्या प्रवाश्यांशी येत असतो. तेव्हा संरक्षणासाठी त्यांना मास्क वाटप केले गेले.वसुंधरा फाउंडेशन संस्थापक सचिन पवार जेसीआय अध्यक्ष मुराद पटेल मनोज भंडारी विजय गायकवाड आरीफ खाटीक उपस्थित होते.