नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूसंदर्भात देशात संपूर्ण दक्षता घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत सरकार पूर्णपणे दक्ष आहे. सर्व मंत्रालये आणि राज्यांमधील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केल. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी असे देखील ते म्हणाले. केंद्र सरकारचे कोणतेही मंत्री येत्या काही दिवसांत परदेश दौर्यावर करणार नाहीत. देशवासीयांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आव्हान देखील त्यांनी केले.